रामपूर सोडण्याची इच्छा नव्हती : जयाप्रदा
   दिनांक :06-Apr-2019
उत्तरप्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केलेत. उमेदवारी अर्जासोबतच पक्षाच्या उमेदवारांचे एकमेकांवर शाब्दिक हल्लेही सुरू झालेत. महागठबंधनचे उमेदवार आझम खान यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर भाजप उमेदवार जयाप्रदा यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यानंतर एकेकाळच्या गाजलेल्या अभिनेत्री आणि सध्याच्या भाजपच्या उमेदवार जयाप्रदा यांनी एका जाहीर सभेत भाषणही केलं. यावेळी, जुन्या आठवणींनी त्यांना भावूक केलं... इतकंच नाही तर त्यांना आपले अश्रूही आवरणं कठीण झालं... आणि पुढचा काही वेळ त्यांना बोलताही आलं नाही.
 
 
 
‘मला रामपूर सोडायचं नव्हतं. कारण इथं चांगलं काम करणार्‍या गरीब लोकांना दाबलं जातं’ असं यावेळी भाजप उमेद्वार जयाप्रदा यांनी म्हटलं. आझम खान यांच्यावर निशाणा साधत, जे लोक त्यांच्याविरुद्ध काम करत होते त्यांना तुरुंगात टाकलं जात होतं... मी सक्रिय राजकारणापासून आणि रामपूर सोडून गेले, कारण माझ्यावर अॅसिड हल्ला करण्याचं षडयंत्र रचण्यात आलं होतं... माझ्यावर हल्लाही करण्यात आला’ असं म्हणत असतानाच त्यांना आपलं रडू आवरता आलं नाही. 1994 मध्ये एन. टी. रामाराम यांच्या तेलगुदेसम पार्टीसोबत जयाप्रदा यांचा राजकीय प्रवास सुरू झाला होता. आंध्रप्रदेशमधून त्या राज्यसभेच्या खासदार म्हणून संसदेत गेल्या. उत्तर प्रदेशच्या सक्रिय राजकारणात आल्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षाचा हात धरला. 2004 आणि 2009 साली समाजवादी पक्षाच्याच तिकीटावर त्या खासदार म्हणून निवडून आल्या. 2011 साली त्या अमर िंसह यांच्या ‘राष्ट्रीय लोकमंच’ या पक्षात सहभागी झाल्या. 2014 साली आरएलडीच्या त्यांनी तिकीटावर त्या बिजनौरमधून निवडणूक लढली. परंतु, यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आता भाजपा हा त्यांचा पाचवा पक्ष ठरलाय्‌... आणि सध्या त्या आझम खान यांना रामपूर लोकसभा मतदारसंघातून थेट आव्हान देत आहेत.
पप पप