नूतनवर्षाभिनंदन...
   दिनांक :06-Apr-2019
सं
वत्‌ हे कालमापनाचे एकक आहे. काळाच्या गतीला एका सुसूत्र पद्धतीने बांधून ठेवण्याचे काम संवत्सर करते. भारतीय परंपरेत सध्या विक्रम संवत्‌ आणि शक संवत्‌ मुख्यत्वे प्रचलित आहेत. विक्रम संवत्‌ इसवी सनाच्या पूर्वी 58 वर्षे, तर शालिवाहन शक संवत्‌ इसवी सनाच्या 78 वर्षांनंतर प्रारंभ झाले. सम्राट विक्रमादित्य यांनी प्रारंभ केल्याने विक्रम संवत्‌ त्यांच्या नावे प्रसिद्ध झाले. राष्ट्रीय शके िंकवा शक संवत्‌ भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका (कॅलेंडर) आहे. शालिवाहन शकाच्या आकड्यामध्ये 78 मिळवले की इसवी सनाचा आकडा येतो. इसवी सनाप्रमाणे लीप इयर असेल तर भारताच्या या राष्ट्रीय दिनदर्शिकेत चैत्र माहिन्याचे 31 दिवस असतात (अन्यथा 30) आणि महिन्याची सुरुवात 21 मार्चला (अन्यथा 22 मार्चला) होते. या राष्ट्रीय पंचांगाची सुरुवात अधिकृतपणे 1 चैत्र, शके 1879 रोजी म्हणजे 22 मार्च, 1957 पासून झाली. वैदिक परिभाषेनुसार समस्त ऋतूंच्या एका पूर्णचक्राला संवत्सर असे म्हणतात. म्हणजेच एक ऋतू प्रारंभ झाल्यानंतर पुन्हा तोच ऋतू येतपर्यंतच्या एका आवृत्तीला संवत्सर असे संबोधन आहे.
 

 
 
सर्वर्तुपरिवर्त्तस्तु स्मृतः संवत्सरो बुधैः।
दुसर्‍या एका व्याख्येनुसार समस्त ऋतूंचा निवास ज्यात असतो त्याला संवत्सर म्हणतात.
संवसन्ति ऋतवः अस्मिन्‌ संवत्सरः
रितुभिहि संवत्सरः शक्प्नोती स्थातुम।
निरुक्तात (वेदांग) समस्त प्राणिमात्रांच्या आयुष्यमानाची गणना संवत्सरात होत असल्याने जिथे प्राणिमात्रांचा निवास आहे अशा काळाच्या (ींळाश शिीळेव) भागाला संवत्सर म्हटले आहे. संवत्सरः संवसन्ते अस्मिन्‌ भूतानि (निरुक्त)
चैत्रे मासि जगद् ब्रह्मा ससर्ज प्रथमे अहनि
शुक्लपक्षे समग्रं तु तदा सूर्योदये सति। (ब्रह्मपुराण )
ब्रह्मदेवाने चैत्रमासातील शुक्लपक्षातील प्रथम दिवशी सूर्योदयाच्या समयी सृष्टीची रचना केली. त्यामुळे चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवसाला सृष्टीचा वाढदिवस अथवा स्थापना दिवस म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. संवत्सराचे पाच प्रकार आहेत. ज्यात सौर, चंद्र, नक्षत्र, सावन आणि बार्हस्पत्य यांचा समावेश होतो. चांद्र संवत्सर तीनशेचौपन्न दिवसांचे मानलेले आहे. तीनशे साठ दिवसांच्या कालखंडाला सावन संवत्सर असे नाव आहे. सौर वर्ष तीनशेपासष्ट दिवसांचे असते. संवत्सराचे बार्हस्पत्य व नक्षत्र असे आणखी दोन प्रकार मानलेले आहेत. बार्हस्पत्य संवत्सरात तीनशेएकसष्ट दिवस असतात. नक्षत्र संवत्सर तीनशेचोवीस दिवसांचे असते.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला रेवती नक्षत्रात विष्कुम्भयोगाच्या वेळी भगवान विष्णूने मत्स्य अवतार धारण केला होता, अशीही मान्यता आहे.
कृते च प्रभवे चैत्रे प्रतिपच्छुक्लपक्षगा।
रेवत्यां योग-विष्कुम्भे दिवा द्वादश-नाड़िका:।
मत्स्यरूपकुमार्यांच अवतीर्णो हरि: स्वयम्‌।।
अगदी प्रारंभीच्या काळात ज्योतिषीय गणना आणि ज्योतिष ग्रंथात शक संवत्‌ प्रचलित होते. शक संवत्‌ हेच शालिवाहन शक म्हणून पुढे प्रचलित झाले. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी िंशपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला. मग या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे. या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते. काही ठिकाणी यास सातवाहनदेखील म्हणतात. भारतातील अनेक प्रांतात वर्षप्रतिपदेपासून चैत्र नवरात्र प्रारंभ होते. लोकमान्यतेनुसार धर्मराज युधिष्ठिराचा राज्याभिषेक या दिवशी झाल्याने त्या दिवशीपासून युधिष्ठिर शक प्रारंभ झाले. ज्यास युगाब्द िंकवा कलियुगाब्द असे संबोधन आहे. या वर्षी युगाब्द 5121 प्रारंभ झाले आहे.
तैत्तिरीय ब्राह्मणग्रंथात संवत्सराला एका पक्ष्याच्या स्वरूपात रूपक वापरून प्रस्तुत केले आहे. या पक्ष्याचे डोके म्हणजे वसंत ऋतू, उजवा पंख ग्रीष्म ऋतू, डावा पंख शरद ऋतू, शेपूट वर्षा ऋतू आणि मध्य भागाला हेमंत ऋतू म्हटले आहे. याच ग्रंथात पुढे अग्नीला संवत्सर, सूर्याला परिवत्सर, चंद्राला इदावत्सर आणि वायूला अनुवत्सर म्हटले आहे. एक संवत्सर एका वर्षांचे असते. असे एकूण साठ (60) संवत्सर आहेत. संवत्सराचे फलाफल हे सूर्याच्या गती आणि कालवैभव यावर आधारित आहे. या साठ संवत्सरातील प्रत्येकी 20-20 संवत्सराच्या समूहाला क्रमश: ब्रह्मिंवशति, विष्णुिंवशति आणि शिविंवशति असे म्हणतात. ही साठ संवत्सर याप्रमाणे-
(1) प्रभव, (2) विभव, (3) शुक्ल, (4) प्रमोद, (5) प्रजापति, (6) अंगीरा, (7) श्रीमुख, (8) भाव, (9) युवा, (10) धाता, (11) ईश्वर, (12) बहुधान्य, (13) प्रमाथी, (14) विक्रम, (15) वृष, (16) चित्रभानु, (17) सुभानु, (18) तारण, (19) पार्थिव, (20) व्यय, (21) सर्वजीत, (22) सर्वधारी, (23) विरोधी, (24) विकृति, (25) खर, (26) नंदन, (27) विजय, (28) जय, (29) मन्मथ, (30) दुर्मुख, (31) हेमलम्बी, (32) विलम्बी, (33) विकारी, (34) शार्वरी, (35) प्लव, (36) शुभकृत, (37) शोभन, (38) क्रोधी, (39) विश्वावसु, (40) पराभव, (41) प्लवंग, (42) कीलक, (43) सौम्य, (44) साधारण, (45) विरोधकृत, (46) परिधावी, (47) प्रमादी, (48) आनंद, (49) राक्षस, (50) नल, (51) िंपगल, (52) कालायुक्‌, (53) सिद्धार्थी, (54) रौद्र, (55) दुर्मति, (56) दुन्दुभि, (57) रुधिरोद्गारी, (58) रक्ताक्ष, (59) क्रोधन आणि (60) क्षय.
ऋग्वेदात उल्लेख केल्याप्रमाणे प्राचीन मंत्रद्रष्ट्या ऋषींनी युगानुयुगे तपस्या करून वर्षप्रतिपदेच्या दिवशीच ग्रह, तारे, नक्षत्र, उपग्रह यांच्या आकाशमंडळातील स्थितीचे ज्ञान प्राप्त केले. म्हणूनच आपल्या सनातन वैदिक िंहदुपरंपरेत कोणतेही मंगलकार्य आरंभ करताना जेव्हा संकल्प उच्चारण होते तेव्हा संवत्सराचा उल्लेख आवर्जून केला जातो. म्हणजेच वर्षप्रतिपदा हा समस्त शुभ संकल्पांचा आरंभिंबदू म्हणता येईल. मंगलकार्यप्रसंगी आपण जो संकल्प करतो ती तर पूर्णतः वैज्ञानिक अशी संकल्पना आहे. नागपुरात 15 वर्षांपूर्वी वर्षप्रतिपदेच्या उत्सवात वर्षप्रतिपदा आणि संकल्प यावर दिलेल्या आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. मुरलीमनोहर जोशी यांनी या विषयी विस्तृत मार्गदर्शन केले आहे. विस्तारभयास्तव त्याचा केवळ सारांश इथे प्रस्तुत करतो. मुळात संकल्प म्हणजे ज्या स्थानी आपण आहोत तेथील ग्रह , तारे, अक्षांश यांची नेमकी स्थिती काय हे जाणून घेणे. पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थाननिश्चिती करण्याकरिता अक्षांश व रेखांश (लॅटिट्युड आणि लॉन्जिट्युड) यांचा आधार घेतला जातो. पूजेतील संकल्प ‘ॐ विष्णुर्विष्णुर्विष्णु: श्रीमद् भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्त्तमानस्य...’ केवळ मंत्र नसून व्यष्टी ते समष्टी साधनेचे संक्षिप्त स्वरूप आहे. आधुनिक काळात जिथे जीपीएससारख्या साधनांचा उपयोग आपण स्थाननिश्चितीकरिता सहज करतो, तेव्हा प्राचीन काळातील हा संकल्प म्हणजे त्या काळातील जीपीएस होते, असे म्हणावेसे वाटते. उत्तर भारतात विक्रम संवत्सर साजरे केले जाते. िंसध प्रांतात वरुण देवता भगवान झुलेलाल यांचा जन्मदिवस चेटीचंड, महाराष्ट्रात गुढीपाडवा, काश्मिरात नवरोज आणि दक्षिण भारतात उगादी पर्व म्हणून उत्सव साजरा केला जातो. चैत्र मासाला मधुमासदेखील म्हणतात. वसंतऋतूमधील आल्हाददायक वातावरणात नवीन वर्ष, नवीन संवत्सराचे गुढी उभारून आपल्या महाराष्ट्रात स्वागत केले जाते. कालपासून शालिवाहन शके 1941 विकारीनाम संवत्सर प्रारंभ झाले आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज गाथेतील अभंगात म्हणतात-
कृपेच्या कटाक्षें निभें कळिकाळा।
येतां येत बळाशक्तीपुढें
तुका म्हणे गुढी आणीन पायांपें।
जगा होइल सोपें नाम तुझें।।
माउली ज्ञानेश्वर महाराज यांनी तर ‘यदा यदा हि धर्मस्य’ या गीतावचनाचे स्मरण अवघ्या हरिभक्तांना करून देत म्हटले आहे की, अधर्म उच्चाटन करताना सज्जनांकरवी सुखाची गुढी उभारावी.
माझे जिवाची आवडी
पंढरपुरा नेईन गुढी
अधर्माचि अवधी तोडीं।
दोषांचीं लिहिलीं फाडीं
सज्जनांकरवी गुढी। सुखाची उभवीं।।
संत चोखोबा त्यांच्या अभंगात म्हणतात-
टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट हे चालावी पंढरीची. सोळाव्या शतकातील शांतिब्रह्म एकनाथ महाराजांच्या काव्यात तर गुढी हा शब्द असंख्य वेळा अवतरतो.
एकनाथ हर्षाची उभवी गुढी
ज्ञातेपणाची, भक्तिसाम्राज्याची
भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची
एकनाथ हर्षाची उभवी गुढी
गाथेत संत तुकाराम त्यांच्या अभंगात म्हणतात- पुढें पाठविलें गोिंवदें गोपाळां, देउनि चपळां हातीं गुढी. सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव असून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी ब्रह्मध्वजपूजन करतात. ब्रह्मध्वजाला हिरवी साडी िंकवा निळे कापड अथवा भगव्या वर्णाची साडी, भगवे वस्त्र नेसवतात. पूर्वी सुवर्ण िंकवा चांदीचे पात्र हे गुढीवर पालथे घातले जाई. पूर्वी देवघरातील देवतांची पात्रे ही चांदीशिवाय इतर कोणत्याही धातूची नव्हती. सध्या तांब्याचे भांडे वापरले जाते. गुढी म्हणजे उंच बांबूची काठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडुिंलबाची डहाळी, आंब्याची पाने, सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदीचा िंकवा पितळेचा तांब्या बसवून गुढी साकारली जाते. ही गुढी स्नेहाचे, मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतीक मानली जाते. ती विजयाचा संदेशही देत असते. त्याग आणि शौर्याचे प्रतीकचिन्ह असलेला भगवा ध्वज मंदिर, देवालये आणि घरांवर उभारला जातो. ब्रह्मध्वजपूजनाविषयीची अधिक माहिती ‘धर्मसिन्धु’ या ग्रंथामध्येही उपलब्ध आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयानंतर लगेचच गुढीचे पूजन करून गुढी उभारावी, असे शास्त्रात सांगितले आहे. ‘ओम ब्रह्मध्वजाय नमः’ असे म्हणून पंचोपचार विधियुक्त गुढीचे पूजन करावे.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले; तो हा विजयोत्सवाचा दिवस. घरातून वालीचा, आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे. याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवासही संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा वध केला, त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र-शुद्ध प्रतिपदेचाच. महर्षी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना याच दिवशी केली. शीख परंपरेतील द्वितीय गुरू अंगददेवजी यांचा हा जन्मदिवस आहे. होय, हे िंहदू राष्ट्र आहे, असे जगाला ठासून सांगणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक, जन्मजात देशभक्त डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा वर्षप्रतिपदा हा जन्मदिवस! आपली सनातन भारतीय वैदिक संस्कृती ही अनादिकाळापासून अक्षुण्ण आहे. बाकी इतर धर्म, मत, पंथ, संप्रदाय यांचे वयोमान तीन ते चारहजार वर्षांपेक्षा जास्त नाही. सनातन वैदिक धर्म हा ज्ञान आणि विवेकवादावर आधारित आहे. आपली संस्कृती पूर्णतः वैज्ञानिक आणि तर्कसिद्ध आहे.
सत्य का आधार लेकर, हम हिमालय से खड़े हैं
शील में, औदार्य में हम, विश्व में सबसे बड़े हैं
सत्याचा स्वीकार आणि असत्याचा त्याग, अविद्येचा नाश आणि विद्याज्ञानाची वृद्धी तसेच सर्व प्राणिमात्रांशी प्रीतिपूर्वक, धर्माधिष्ठित आणि आत्मीय व्यवहार हाच वेदांचा शाश्वत संदेश आहे. ‘सत्यमेव जयते’ हा वैदिक घोषमंत्र, सत्याचा नेहमीच विजय होतो हे सांगणारा महामंत्र आहे. िंहदू प्राचीन कालगणनेचे सुधारित स्वरूप म्हणजेच राष्ट्रीय पंचांग हे भारताच्या संविधानाने स्वीकारले आहे. राष्ट्रीय पंचांगाचा आपल्या जीवनात, व्यवहारात जास्तीत जास्त उपयोग, हा संकल्प या नूतन वर्षापासून आपण करायला हवा. भोगापासून योगाकडे जाण्याचा, वसुंधरेला विनाशापासून वाचवण्यासाठी भारतमातेला सामर्थ्यशाली करण्याचा संकल्पदिन म्हणजे वर्षप्रतिपदा! समस्त सृष्टीचे नूतन वर्ष असलेल्या वर्षप्रतिपदेच्या समस्त वाचकांना शुभेच्छा! आपला व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय संकल्प भारताच्या भाग्योदयाची नांदी ठरो, हीच नव्या वर्षाच्या प्रथम उत्तरायणी मंगलकामना. नूतनवर्षाभिनंदन!!!
• प्रा. भालचंद्र माधव हरदास
9657720242
(लेखक सामाजिक, सांस्कृतिक आणि
आध्यात्मिक विषयाचे अभ्यासक आहेत.)
••