अखेर 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचे ग्रहण सुटले !
   दिनांक :06-Apr-2019
 
मागील काही दिवसांपासून 'पीएम मोदी' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने त्याच्या प्रदर्शनाला 'ग्रहण' लागले होते . अनेक विरोधी पक्षांकडून चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी विरोध होत होता. पण आता या चित्रपटाला हिरवा कंदील मिळाला आहे.  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशोगाथेवर आधारलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे मार्ग मोकळे झाले आहेत. निर्माता संदीप सिंगने शुक्रवारी ट्विटरच्या मध्यमातून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 'पीएम नरेंद्रे मोदी' चित्रपट ११ एप्रिल २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. विरोधी पक्षाकडून आचारसंहिता सुरू असताना चित्रपट प्रदर्शित करू न देण्याची मागणी करण्यात आली होती.
 
 
 
 
'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात अभिनेता विवेक ऑबेरॉय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची भूमिका साकारताना दिसणार आहे. निवडणुकीचे बिगुल वाजले असताना चित्रपटाच्या प्रदर्शनावर रोख लावण्यात आला होता. त्याचप्रमाणे चित्रपटावर अनेक टीका ही करण्यात येत होत्या. गुजरातच्या वेग-वेगळ्या भागांमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.