प्रियांका वढेरा सोशल मीडियात ट्रोल
   दिनांक :06-Apr-2019
नवी दिल्ली:
 अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वढेरा यांनी काश्मीरच्या लोकांना शुभेच्छा देताना नवरेह ऐवजी नवरोज अशा शब्दाचा उल्लेख केला. त्यामुळे त्या सोशल मीडियावर चांगल्याच ट्रोल झाल्या.
 
 
 
चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी देशातील विविध राज्यांमध्ये अनेक सण साजरे केले जातात. उत्तर भारतात नवरात्री, दक्षिण भारतात उगादी, महाराष्ट्र-गोवा याठिकाणी गुढीपाडवा अशी या सणांची विविध नावे आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये आजच्या दिवशी नवरेह सण साजरा केला जातो. प्रियांका वढेरा यांनी काश्मीरच्या लोकांना शुभेच्छा देताना नवरेहऐवजी नवरोज अशा शब्दाचा उल्लेख केल्याने प्रियांका सोशल मीडियात ट्रोल झाल्या.
 
 
 
दरम्यान, प्रियांका यांच्या ट्विटवर काहीजणांनी नवरोजच्या शुभेच्छा दिल्या तर काहींनी त्यांना नवरोज हा पारशी लोकांचा सण असल्याची आठवण करून दिली. प्रसिद्ध लेखक तारेक फतेह यांनी ट्विट करत प्रियांका यांना सांगितले की, नवरोज मागील महिन्यात साजरा केला गेला आहे. काश्मीरमध्ये नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी जो सण साजरा केला जातो त्याला नवरेह नावाने ओळखले जाते.