शत्रुघ्न सिन्हांची उमेदवारी जाहीर
   दिनांक :06-Apr-2019
भाजपातून काँग्रेसमध्ये दाखल झालेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आजच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काही वेळातच काँग्रेसने लोकसभेसाठी त्यांची उमेदवारी जाहीर केली. बिहारमधील पटना साहिब लोकसभा मतदारसंघातून ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसने नुकतीच उमेदवारांची आपली पाचवी यादी जाहीर केली, त्यामध्ये सिन्हा यांच्या नावाचा समावेश आहे.

 
या पाचव्या यादीमध्ये काँग्रेसने पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये बिहारच्या पटना साहिबमधून शत्रुघ्न सिन्हा, हिमाचल प्रदेशच्या हमिरपूरमधून राम लाल ठाकूर, पंजाबच्या खादिरसाहिब येथून जसबिरसिंग गिल, फतेहगढ साहिब येथून डॉ. अमर सिंग आणि फरिदकोट येथून मोहम्मद सादिक या उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे.