एसटीला लागली अचानक आग
   दिनांक :06-Apr-2019
 
मेहकर -नागपूर बस मधील घटना .
मालेगाव : मेहकर वरून नागपूरकडे जाणाऱ्या एसटी (बस) क्रमांक एम एच ४० ए क्यू् ६२८६ शहरातील अकोला फाटा येथे आली असता चालकाच्या केबिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याने चालक-वाहक प्रवाशांमध्ये एकच तारांबळ उडाली. ही घटना आज सकाळी  ९: ३० वाजता दरम्यान अकोला फाटा येथे घडली. ही बस मेहकर वरून नागपूरसाठी जात असताना नेहमीप्रमाणे मालेगाव शहरात आली मात्र धावत्या एसटिला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली धावत्या बसमध्ये लागलेल्या आगीमुळे प्रवाशांसह वाहक व चालकामध्ये एकच तारांबळ उडाली चालकाने प्रसंगावधान राखून एस टी ताकाळ थांबविली तेंव्हा बस मधील प्रवाशी गाडीमधून पटापट खाली उतरले.  शहरातील अकोला फाटा येथील वर्दळीच्या ठिकाणी उपस्थित नागरिकांनी क्षणाचा विलंब न लावता पाण्याने भरलेल्या बदल्या, कॅन आदी ने पाणी टाकून आग विझविली.