शोपीयान चकमक: दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
   दिनांक :06-Apr-2019
श्रीनगर :
 लष्कराने काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात आघाडी उघडली असून, आज शोपियान जिल्ह्यातील इमाम साहिब परिसरात झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.
 
 
शोपियान जिल्ह्यातील इमाम साहिब परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने या परिसराला घेराव घातला. त्यानंतर दोन्हीकडून गोळीबारास सुरुवात झाली. अखेरीस लष्कराने लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळवले.