अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
   दिनांक :06-Apr-2019
भाजपाचे विद्यमान खासदार आणि बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी शनिवारी (दि.६) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या पाच वर्षात मोदी सरकारच्या कारभारावर त्यांनी वारंवार टीका केली होती. तसेच अनेकदा त्यांनी थेटपणे पंतप्रधान मोदींविरोधातही भाष्य केले होते. त्यामुळे ते भाजपापासून दुरावले होते. त्यातच भाजपाने त्यांचे लोकसभेचे तिकीटही कापल्याने अखेर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याची घोषणा केली होती. दरम्यान, दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयात काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
 
 
काँग्रेसप्रवेशावेळी आपल्या भावना व्यक्त करताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, भाजपाच्या स्थापना दिनीच जड अंतकरणाने मला माझा जुना पक्ष सोडावा लागत आहे. यामागचे कारण सर्वांनाच माहिती आहे. आपल्या लोकांच्या भल्यासाठी मी काँग्रेसमध्ये दाखल झालो आहे.