कागर चित्रपटातील 'हे' गाणं सोशल मीडियावर हिट
   दिनांक :07-Apr-2019
 आगामी ‘कागर’ या चित्रपटाच्या टीझरची चर्चा सोशल मीडियावर असतानाच या चित्रपटातील पाहिले  गाणे  नुकतेच प्रदर्शित करण्यात आले . ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू आणि शुभांकर तावडे यांची लव्हस्टोरी दाखवणारे ‘लागलीया गोडी तुझी’ हे गाणं सोशल मीडियावर हिट ठरत आहे. युट्यूबवर या गाण्याला लक्षावधी व्ह्यूज मिळाले असून १५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
 
 
‘लागलीया गोडी तुझी’ हे रोमॅण्टिक गाणं असून यामध्ये रिंकू आणि शुभांकर यांची प्रेमकथा पाहायला मिळत आहे . ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी हे गाणं शब्दबद्ध आणि संगीतबद्ध केलं आहे. तर शशा तिरुपती आणि हर्षवर्धन वावरे यांनी हे गाणं गायलं आहे.