ॲमेझॉन उभारणार अंतराळात तीन हजार उपग्रहांचे जाळे!
   दिनांक :07-Apr-2019
- वेगवान इंटरनेट सेवेसाठी प्रकल्प
 
सॅन फ्रॅन्सिस्को: 
 
ई-कॉमर्स व तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘अॅमेझॉन’तर्फे वेगवान इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अंतराळात तीन हजार उपग्रहांचे नेटवर्क स्थापन करण्यात येणार आहे.
 
 
 
जगप्रसिद्ध उद्योगपती जेफ बेजॉस यांनी ‘स्पेस वेंचर’ उपक‘मांतर्गत ’प्रोजेक्ट कुईपर’ ही योजना तयार केली आहे. या माध्यमातून अंतराळात ३ हजार २३६ उपग्रहांचे जाळे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून अजूनही इंटरनेट न पोहोचलेल्या भागात वेगवान इंटरनेट सेवा पुरवण्यात येणार आहे. अलीकडेच अॅमेझॉनने या प्रकल्पातील नोकर्‍यांसाठी जाहिरातीही दिल्या आहेत.
 
‘प्रोजेक्ट कुईपर’ हे एक नवे पाऊल असून, उपग्रहांच्या जाळ्यामुळे लाखो लोकांना अत्यंत वेगवान इंटरनेटची सुविधा मिळेल, असा विश्वास अॅमेझॉनने व्यक्त केला आहे. अॅमेझॉनच्या या प्रकल्पाबद्दल तंत्रज्ञानाशी संबंधित ‘गीकवायर’ या संकेतस्थळावर माहिती देण्यात आली असून, या प्रकल्पासाठी अब्जावधी डॉलरचा खर्च होणार आहे.