चीनचे दहा तुकडे झाल्यास जगाचा धोका टळेल; चिनी लेखकाचा दावा
   दिनांक :07-Apr-2019
पॅरिस:
 आर्थिक महासत्ता झालेला चीन हा संपूर्ण जगासाठी धोकादायक झालेला असून, त्याचे दहा तुकडे झाले, तर मानवजातीसाठी ते चांगले ठरेल, असे वक्तव्य निर्वासित चिनी लेखक लियाओ यिवू यांनी केले आहे.
 
 
 
चीनमधील थियानमेन चौकात झालेल्या आंदोलनावर कविता लिहिल्यामुळे, लियाओ थिवू यांनी तुरुंगवास भोगला आहे. त्यांनी ‘बॉल्स ऑफ ओपियम’ नामक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे फ्रान्समध्ये प्रकाशन झाले.
 
बीजिंगच्या तिनानमेन चौकात १९८९ मध्ये झालेल्या आंदोलकांना लष्कराने रणगाड्यांनी चिरडून ठार मारले होते. त्याची कहाणी या पुस्तकात आहे. चीनमध्ये या पुस्तकावर तत्काळ बंदी घालण्यात आली. हा नरसंहार ‘४ जूनची घटना’, या नावाने ओळखला जातो. चीनच्या इतिहासावरील हा एक डाग आहे, असे प्रतिपादन लियाओ थिवू यांनी केले आहे.