राजधानी एक्स्प्रेसमधील २० प्रवाशांना विषबाधा
   दिनांक :07-Apr-2019
नवी दिल्ली :
 
 
दिल्ली-भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेसमधील प्रवाशांनी रेल्वेच्या कॅटरिंग सेवेतर्फे मिळालेले जेवण घेतल्यानंतर २० जणांना विषबाधा झाली. ही घटना समोर येताच डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर लगेच उपचार केले. सर्व प्रवाशांची प्रकृती आता चांगली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जेवणाचे नमुने चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, अहवाल आल्यानंतर नेमका प्रकार लक्षात येईल, असे सूत्रांनी सांगितले.