राजीव कुमार यांच्या अटकेवर उद्या निर्णय
   दिनांक :07-Apr-2019
 
 सर्वोच्च न्यायालयात सीबीआयची याचिका
 
नवी दिल्ली: कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्यातील सत्य बाहेर आणण्यासाठी कोलकाताचे माजी पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना अटक करण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती करणारी याचिका सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील न्यायासन उद्या सोमवारी आपला निर्णय देणार आहे.
राजीव कुमार यांना अटकेपासून दिलासा देणारा आपला 5 फेबु्रवारीचा निर्णय न्यायालयाने मागे घ्यावा आणि त्यांना सीबीआयच्या कोठडीत देण्यात यावे, अशी विनंती या याचिकेतून करण्यात आली आहे.

 
 
 या घोटाळ्याची व्याप्ती फार मोठी आहे आणि राजीव कुमार यांच्याकडे या प्रकरणी बरीच माहिती आहे. न्यायालयाचे सुरक्षा कवच मिळाले असल्याने, ते तपासात सहकार्य करीत नाही, त्यामुळे घोटाळ्यातील सत्य समोर आणणे कठीण जात आहे. अशा स्थितीत न्यायालयाने त्यांच्या अटकेवरील स्थगिती मागे घेणेच योग्य ठरेल, असेही सीबीआयने स्पष्ट केले.
राजीव कुमार यांच्यासोबतच बंगालमधील आणखी काही पोलिस अधिकार्‍यांचीही चौकशी करण्याची गरज आहे, असेही याचिकेत म्हटले आहे.