मी केवळ सिग्नल देत होतो : पवार
   दिनांक :07-Apr-2019
माढ्याची जागा सुरुवातीपासून आमच्याकडे आहे. ही जागा आणण्यासाठी अधिक काळजी घ्यावी म्हणून मी केवळ तिथून निवडणूक लढवणार असे सिग्नल देत होतो. मात्र मी तिथून लढणार नव्हतो. तसा माझा विचार नव्हता. आम्हाला विजयिंसह मोहितेंना तिथून लढवायचं होतं. मात्र त्या मतदारसंघात बाकीच्या 5 विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या नावाला विरोध होता. मात्र इथला उमेदवार हा त्यांच्या सहकार्याने दिला असता, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. या सर्व घडामोडींचे विश्लेषण करीत असतानाच, कॉंग्रेसचा जनाधार कमी होत आहे, असे भाष्य शरद पवार यांनी केले.
 
 
 
अहमदनगरच्या जागेच्या वादावरून बोलताना ते म्हणाले की, अहमदनगरच्या जागेविषयी कॉंग्रेसचे जे राज्यातील अन्य घटक होते ते आम्हाला सांगायचे की इथे तुमची ताकत जास्त आहे. ही जागा नेहमी राष्ट्रवादीने िंजकलीय, असे पवार यांनी सांगितले. अहमदनगरचा संघर्ष माझ्यामुळे नाही झाला. त्यावेळी राजीव गांधींनी ही जागा िंजकायचीय असं मला सांगितलं होतं, म्हणून मी लढलो आणि त्यावेळी िंजकलो. यावेळीही मी त्यांचं नावही घेतलं नव्हतं, असे पवार यांनी विखे पाटलांचे नाव न घेता सांगितलं. अहमदनगरचं गणित स्पष्ट आहे. राष्ट्रवादीकडे मत जास्त होती. हे माझ्या सहकार्‍यांचं सामूहिक मत होतं, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला, असे ते म्हणाले.
राजकारणात आतापर्यंत केवळ धोरणात्मक टीका व्हायची. मात्र नरेंद्र मोदींऐवढी व्यक्तिगत टीका दुसर्‍या कोणत्याही नेत्याने केली नाही, अशा शब्दात शरद पवारांनी पंतप्रधानांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. तिहारमधील कैद्यानं राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडवल्याचा गौप्यस्फोट काल मोदींनी गोंदियात आयोजित सभेत केला होता. तसंच पवार कुटुंबांमध्ये कलह सुरू असल्याचं विधान मोदींनी वर्ध्यामधल्या सभेत केलं होतं.
यावेळी पवार म्हणाले की, आज देशातील आणि राज्यातील राजकीय हवा बदलली आहे. आजच्या राज्यकर्त्यांच्या संदर्भात ग्रामीण भागातील नागरिकांच्या संतप्त भावना आहेत. अशी परिस्थिती आजवर कधी पाहिली नाही. देशाच्या पातळीवर बदल व्हावा अशी भावना लोकांची आहे, असे पवार म्हणाले.
पाच वर्षापूर्वी गुजरात पॅटर्न हे विकासाचे मॉडेल आहे अशी भावना लोकांच्या मनात होती. पाच वर्षांपूर्वी विकासाचे आश्वासन देत हे एनडीए सरकारमध्ये आले. विकास ही त्यांच्या प्रचाराची दिशा होती. मात्र आता मोदींच्या प्रचाराची दिशा धार्मिक आहे, अशी टीका पवारांनी केली. पाच वर्षात अपेक्षेची पूर्तता झाली नाही. मागील निवडणुकांत एकदाही िंहदू शब्द वापरला नाही, विकास हाच शब्द वापरला, आता मात्र िंहदू आणि दहशतवाद या शब्दाचा वापर करून निवडणुका लढवत आहेत, अशी घणाघाती टीका पवार यांनी केली.
 
सत्ताधार्‍यांना हल्ल्यांचा
राजकीय फायदा घ्यायचाय
मोदी हे 56 इंचाची छाती आहे, असे ज्या दिवसापासून सांगायला लागले तेव्हापासून त्यांचा उद्देश समोर येऊ लागला. दहशतवाद्यांवर आणि पाकिस्तानवर कॉंग्रेसच्या काळातही अनेक हल्ले केले, मात्र त्याचा गाजावाजा कधी केला नाही. या हल्लयांचे श्रेय हे सैन्याला दिलं पाहिजे. यात राजकारण आणू नये. मात्र यावेळी सरळ दिसत होतं की, यांना या हल्ल्यांचा राजकीय फायदा घ्यायचा आहे, असेही पवार म्हणाले.
यावेळी ते म्हणाले की, देशात परिवर्तनाची गरज आहे. त्यासाठी आम्ही देशभरात मोदींच्या विरोधात एकत्र आलो. यासाठी मी पुढाकार घेतला. मी पुढाकार घेतल्याने मोदी नाराज झाले. माझा प्रामाणिक प्रयत्न असा होता की एनडीएविरोधी घटकांना एकत्र आणायचं. किमान संवाद व्हायला हवा, अशी माझी भूमिका होती. या लोकसभा निवडणुकीनंतरही विखुरलेल्या विरोधकांना एकत्रित आणण्याचे प्रयत्न करू, असेही पवार म्हणाले.
पप पप