त्राल परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक
   दिनांक :07-Apr-2019
पुलवामा:
 
जम्मू-काश्मीरमधील त्राल परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज, रविवारी सकाळी चकमक झाली. सुरक्षा दलांच्या जवानांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती समजते. दरम्यान, शोपियान जिल्ह्यातील इमाम साहिब परिसरात सुरक्षा दलांनी काल केलेल्या कारवाईत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं.
 
 
शोपियानमधील चकमकीला काही तास उलटत नाहीत तोच, पुलवामातील त्राल परिसरात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सुरक्षा दलांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले आहे. सध्या गोळीबार थांबला असून, सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, काल शनिवारी शोपियानमधील चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटनेचे दोन दहशतवादी मारले गेले. राहिल राशिद शेख आणि बिलाल अहमद अशी त्या दोन्ही दहशतवाद्यांची नावे होती. त्यातील राहिल हा तीनच दिवसांपूर्वी संघटनेत सामील झाला होता. तो गांदरबल जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याचं एमटेकपर्यंत शिक्षण झालं होतं.