प्रीतीचा पुळका
   दिनांक :07-Apr-2019
चहा, कॉफी, कोलिंड्रक्स पित, वेफर्स खात मित्र-मैत्रिणींसोबत मनातल्या गुजगोष्टी करण्यासाठी तो काही कॉलेजचा कट्टा नव्हता. चारचौघात बोलण्यासारख्या, गाववेशीच्या चावडीवर बोलण्यासारख्या गोष्टी नव्हता. अर्थात सार्वजनिक स्थळी चार चौघांना ऐकू जाईल अशा गोष्टी नव्हत्या. अशा गोष्टी मूळातच उघडपणे बोलणे आपल्या भारतीय संस्कृतीत बसत नाही. होय, मी मी कॉफी विथ करण या टीव्ही शोमधील युवा क्रिकेटपटू लोकेश राहुल व हार्दिक पांड्याच्या निर्लज्जपणे केलेल्या स्त्रीविषयक अपमानास्पद विधानाबद्दल बोलत आहो.
 
 
 
वास्तविक या टीव्ही शोमध्ये मुलाखत घेणार्‍याला कोणते प्रश्न केले पाहिजे, कसे केले पाहिजे,याचे भान ठेवायला हवे होते. टीव्ही शो म्हणजे प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकांसाठी असतो. घरातली सर्व लहान मोठी मंडळी एकत्र बसून टीव्ही शो बघत असतात. तेव्हा सादरकर्त्यांनी याबाबतीत भान राखायला हवे व तारतम्य बाळगायला हवे. अशा शोमधून राहुल व पांड्याने केलेले विधान अतिशय घृणास्पद होते. त्यांच्या या विधानांचे कोणतीही स्त्री समर्थन करूच शकत नाही. राहुल व पांड्याने महिलांबाबत अपमानास्पद विधान केल्यानंतर त्यांच्यावर देशभरातून जोरदार टीका झाली. त्याचे परिणामही दोघांना भोगावे लागले. या दोघांनाही बीसीसीआयने तात्पुरते निलंबित केले व नंतर पुन्हा संघात घेतले. मात्र आयपीएलमधील िंकग्ज इलेव्हन पंजाब संघाची सहमालकीण अभिनेत्री प्रीती िंझटाला या दोघांचा चांगलाच पुळका आलेला दिसतोय. वास्तविक लोकेश राहुल हा तिच्या िंकग्ज इलेव्हन पंजाबचा, तर हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघाचा खेळाडू आहे. प्रीती िंझटाने या दोघांचे समर्थन करावे याचे आश्चर्य वाटले.
कॉफी विथ करणच्या शोमधील लोकेश राहुल व हार्दिक पांड्या यांच्या लैंगिकवादी विधानांचा देशभर बाऊ करण्याचे काही कारण नव्हते. हा संपूर्ण विवाद सुरु झाल्याबद्दल मला वाईट वाटते. हे प्रकरण एवढे चव्हाट्यावर कसे काय आले कळत नाही. ते दोघेही युवा आहे, हा त्यांचा शिकण्याचा काळ आहे. तुम्ही चुका केल्या नाही, तर शिकणार नाही, असे म्हणत प्रीती िंझटाने या दोघांना आपल्या पाठीशी घालविले.
वास्तविक राहुल अतिशय चांगला आहे. स्त्रीयांबद्दल त्याला आदर आहे. या घटनेनंतर तोसुद्धा स्वतःला संशयित अपराधी म्हणून बघू लागला होता. मात्र ते सर्व प्रकरण विसरून आता तो चांगला फॉर्मात आला आहे. चांगला खेळतो, असे म्हणत प्रीतीने त्याचे समर्थन केले.
प्रीती बाई ते सर्व ठीक आहे. तो उत्तम खेळाडू आहे, म्हणून देशातील युवा पिढी त्यांना आपला आदर्श मानतात. त्याने केलेल्या वेशभूषा, केशभूषा आणि कृत्याचे अनुकरण करू पाहतात. मग त्यांनी केलेल्या कृत्याचेही इतर युवकांनी अनुकरण करावे असे तुला म्हणायचे आहे काय. हे सर्व भारतीय संस्कृतीत बसत नाही.
गेली दोन दशके िंहदी चित्रपट सृष्टीत घालविल्यानंतर आपले नाव व पैसाचा उपयोग करत आयपीएलमध्ये िंकग्ज इलेव्हन पंजाब संघाला खेळवतेय. वास्तविक उद्योगपती नेस वाडियानेच तुला आयपीएलमध्ये आणले. त्याच्यासोबतचे संबंध तुटल्यानंतर तू अमेरिकेतील लॉस एंजेलिसस्थित उद्योगपती जीन गुडेनॉशी विवाहबद्ध झाली. त्यामुळे तुला सांगावेसे वाटते की, अमेरिकन संस्कृती आणि भारतीय संस्कृती भिन्न आहे. तेव्हा प्रीती तू लोकेश व हार्दिकप्रती कितीही लळा दाखविला, तरीही बीसीसीआयमधील नियुक्त लोकपालांनी पाठविलेल्या नोटीशीचे उत्तर देण्यासाठी तुझ्या लाडक्या लोकेश व हार्दिकला सामोरे जावे लागणार आहे. चुकीला माफी नाही... एवढेच...
मिलिंद महाजन
7276377318
श्रश्र