विवेक ओबेरॉयला 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा
   दिनांक :07-Apr-2019
‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक ओबेरॉय याने राजकारणात प्रवेश करण्यासंबंधी वक्तव्य करत सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. भविष्यात राजकारणात प्रवेश केल्यास वडोदरा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे विवेक म्हणाला. त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त आयोजित एका कार्यक्रमात त्याने ही इच्छा बोलून दाखवली.
 
 
‘मी राजकारणात प्रवेश केला तर २०२४च्या लोकसभा निवडणुकांसाठी वडोदरा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छितो. पंतप्रधान मोदी जेव्हा या मतदारसंघातून निवडणूक लढले, तेव्हा त्यांना स्थानिकांकडून मिळालेलं प्रेम आणि प्रतिसाद या गोष्टींमुळेच मलासुद्धा त्या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा आहे,’ असं तो म्हणाला.