शेतकऱ्यांना सरसकट ६ हजार आणि पेन्शन, भाजपचं 'जय किसान'
   दिनांक :08-Apr-2019
नवी दिल्ली,
काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात 'न्याय योजने'च्या माध्यमातून 'गरिबी हटाव'चा नारा दिलेला असतानाच भाजपचनेही 'जय जवान, जय किसान'चा नारा देत निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला आहे. या जाहीरनाम्यातून शेतकऱ्यांना वर्षाला सरसकट ६ हजार रुपये आणि पेन्शन देण्याचं आश्वासन दिलं आहे. विशेष म्हणजे भाजपने काँग्रेसच्या धर्तीवरच 'न्याय योजने'चीही घोषणा केली आहे.

 
 
भाजपने त्यांच्या संकल्पपत्राला 'संकल्पित भारत, सशक्त भारत' असं नाव दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या संकल्पपत्राचं प्रकाशन करण्यात आलं. या जाहीरनाम्यातून शेतकऱ्यांपासून गर्भवती स्त्रियांपर्यंतच्या सर्वांची काळजी घेतली आहे. सुरक्षा दलाचं सशक्तीकरण करतानाच त्यांना फ्रि हँड देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. तसंच छोट्या दुकानदारांना पेन्शन देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.