राहुल गांधी, सुर्जेवाला यांना न्यायालयाचा समन्स
   दिनांक :08-Apr-2019
 
 
अहमदाबाद: अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेने दाखल केलेल्या फौजदारी मानहानी खटल्यात येथील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आज सोमवारी कॉंगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीपिंसह सुर्जेवाला यांना समन्स जारी करून, 27 मे रोजी न्यायालयात हजर होण्याचा आदेश दिला आहे.
 
 
 
नोटबंदी जाहीर झाल्यानंतर नोव्हेंबर 2016 अवघ्या पाच दिवसांत 750 कोटी रुपयांच्या बाद नोटा या बँकेच्या माध्यमातून बदलविण्यात आल्या होत्या, असा आरोप राहुल गांधी आणि सुर्जेवाला यांनी केला होता. या प्रकरणी बँकेने या दोघांंविरुद्ध फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला आहे.
कॉंगे्रसच्या या दोन्ही नेत्यांविरुद्ध आम्हाला ठोस पुरावे मिळाले आहेत, त्यामुळे हा खटला दाखल करून घेत आमचे न्यायालय त्यांना समन्स जारी करीत आहे. या दोघांनीही कुठलेही कारण न सांगता न्यायालयात हजर राहावे, असे न्या. एस. के. गाढवी यांनी आपल्या आदशात स्पष्ट केले.