जगात भारताचा मान मोदींनीच वाढविला- खा. वरुण गांधी यांचे प्रतिपादन
   दिनांक :08-Apr-2019
नवी दिल्ली,
माझ्या कुटुंबाने देशाला काही पंतप्रधान दिले आहे; पण जगात भारताला जो सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाला, तो मान आजवरच्या कोणत्याही पंतप्रधानांमुळे मिळू शकला नव्हता. नरेंद्र मोदी केवळ देशासाठी जगत असून, देशासाठीच ते आपले प्राण देतील. त्यांना केवळ देशाचीच िंचता आहे, असे स्पष्ट प्रतिपादन भाजपा नेते आणि खासदार वरुण गांधी यांनी आज सोमवारी केले.
 

 
 
वरुण गांधी भाजपाचा राजीनामा देऊन कॉंगे्रसमध्ये जाणार आहेत, अशा आशयाचे वृत्त अनेक प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केले. याच अनुषंगाने एका िंहदी वृत्तवाहिनीने त्यांची मुलाखत घेतली. आपण भाजपा सोडणार आहात काय, असे विचारले असता, मी भाजपा सोडली तर राजकारणालाही रामराम करेन. पंतप्रधान मोदी हे मला पितृतूल्य आहेत, असे वरुण गांधी यांनी सांगितले. या मुलाखती त्यांनी राहुल गांधी आणि प्रियांका वढेरा यांच्यावरही चर्चा केली.
सुल्तानपूरऐवजी पिलिभीत मतदारसंघातून निवडणूक लढवण्याविषयी वरुण गांधी म्हणाले की, जेव्हा तुम्ही एखाद्या पक्षात असता, तेव्हा निर्णय नेतृत्वावर सोडावा लागतो. मला सुल्तानपूरऐवजी पिलिभीतमधून लढण्यास सांगण्यात आले. माझ्यासाठी सुल्तानपूर जसे घर आहे तसेच पिलिभीतही घरच आहे.
माझ्यावर भावना भडकावणारे भाषण देणारी व्यक्ती, असे आरोप आहेत; मात्र सर्व प्रकरणांमध्ये माझा विजय झाला. यापूर्वीच्या उत्तरप्रदेश सरकारने माझी माफीही मागितली आहे. मी िंहदू आहे आणि माझ्या दिवसाची सुरुवात हनुमान चालिसाने होते, पण माझ्या धर्माचा माझ्या राजकारणाशी काही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी यांच्याशी आतापर्यंत जितकेवेळा भेटलो, त्या प्रत्येक भेटीत मी त्यांच्यातील एका चांगला नेता आणि एक चांगला माणूस त्यांच्यात पाहिला आहे. जेव्हा माझ्या आयुष्यात संकट आले, ते माझ्या पाठीशी वडिलांप्रमाणे उभे राहिले. जेव्हा माझ्या पहिल्या मुलीचा मृत्यू झाला, त्यावेळी मी खचलो होतो, सर्वांत आधी मला पंतप्रधान मोदी यांचा फोन आला होता. देव परीक्षा घेतो, असे त्यांनी म्हटले होते. देवाने एक देवी घेतली आहेश तो दुसरी देवी देईल, असे ते म्हणाले होते.
आतापर्यंत सुमारे लाखो लोकांनी मी कॉंग्रेसमध्ये सहभागी होणार असल्याचा दावा केला आहे; पण असे काही नाही. मी एकाच नावेत स्वार होणारा माणूस आहे. त्यामुळे जेव्हा मी भाजपा सोडेन, तेव्हा मी राजकीय संन्यास घेतलेला असेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या जातात, त्यावर वरुण गांधी म्हणाले की, हे चुकीचे आहे. पंतप्रधान मोदी केवळ देशातच नाही, तर विदेशातही प्रचंड लोकप्रिय आहेत. एखाद्या पंतप्रधानाला चोर म्हणणे चुकीचेच आहे.