'हा' जाहीरनामा नसून ‘माफीनामा’ : काँग्रेस
   दिनांक :08-Apr-2019
नवी दिल्ली,
लोकसभा निवडणुकीआधी देशभरात राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. निवडणुकीच्या तीन दिवस आधी भाजपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून त्यास 'संकल्पपत्र' असे नाव देण्यात आले आहे. भाजपाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी भरघोस घोषणा करण्यात आल्या आहेत.
 
 
 
दरम्यान, काँग्रेसने भाजपाच्या जाहीरनाम्यावर टीका केली आहे. ​​भाजपा आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील फरक पहिल्या पानावर दिसून येतो. काँग्रसकडे लोकांची गर्दी आहे तर भाजपाच्या जाहीरनाम्यात फक्त एकच माणूस आहे. भाजपाने जाहीरनामाऐवजी ‘माफिनामा’ सादर केल्याचे काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी म्हटले आहे.
 
 
यासोबतच काँग्रेसने आमच्या जाहीरनाम्यात देशातील जनतेचे विचार समाविष्ट होते, मात्र भाजपाच्या जाहीरनाम्यात फक्त एका व्यक्तीच्या मनातील गोष्ट असल्याची टीका पटेल यांनी यावेळी केली.