भाजपाच्या शुभांगी मेंढे यांच्या प्रचार सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद
   दिनांक :08-Apr-2019
भंडारा : भाजपाचे लोकसभा उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या धर्मपत्नी शुभांगी मेंढे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली असून तालुक्यातील सोनी, गणखैरा जिप क्षेत्रात 1 एप्रिल रोजी सभा घेतल्या.
 

 
 
यावेळी त्यांच्यासोबत भंडार्‍याच्या नगरसेविका मथुरा मदनकर, भाजपा महिला आघाडी महामंत्री झासी गभने, प्रदेश महिला आघाडी सदस्य सीता रहांगडाले, जिप सदस्य रोहिणी वरखडे, तालुका अध्यक्ष चित्रकला चौधरी, सरपंच अल्का पारधी, शशी पुंडे, शहर अध्यक्ष प्रज्ञा रंगारी व महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांच्या सभांना क्षेत्रातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला व ‘फिरसे एक बार मोदी सरकार’चे नारे लावून साथ दिली. यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांनीही मार्गदर्शन केले.