मल्ल्याला झटका; याचिका फेटाळली
   दिनांक :08-Apr-2019
लंडन :
नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून विदेशात पसार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याला ब्रिटनच्या हायकोर्टाने झटका दिला आहे. प्रत्यार्पणाच्या आदेशाला आव्हान देणारा मल्ल्याचा विनंती अर्ज हायकोर्टाने फेटाळून लावला आहे. याबाबत 'टाइम्स नाऊ'ने वृत्त दिले आहे.
 

 
ब्रिटनचे गृह सचिव साजिद जाविद यांनी मल्ल्याविरोधात प्रत्यार्पण आदेशावर स्वाक्षरी केली आहे. ब्रिटन सरकारच्या या आदेशाविरोधात मल्ल्याने हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. या आदेशाला आव्हान देण्यास परवानगी मिळावी म्हणून मल्ल्याने अर्ज केला होता. मात्र अशी परवानगी देण्यास ब्रिटनच्या हायकोर्टाने नकार दिला आहे.
दरम्यान, ईडी आणि सीबीआय या दोन तपास यंत्रणांकडून मल्ल्याची चौकशी सुरू असून मल्ल्याला आज ब्रिटनच्या कोर्टाकडून झटका मिळाल्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणाची आशा अधिक बळावली आहे.