‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपटातील अभिनेत्याचे निधन
   दिनांक :09-Apr-2019
 -  ‘सिंटा’ने ट्वि करून दिली माहिती 
  
 
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातील अभिनेते नवतेज हुंडल यांचे निधन झाले आहे. या चित्रपटात नवतेज हुंडल यांनी गृहमंत्री ही व्यक्तीरेखा साकारली होती. सोमवारी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला. ‘सिंटा’ने (CINTAA) त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन या विषयी माहिती दिली आहे. 
 
 
“अभिनेता नवतेज हुंडल यांचे निधन झाले असून आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो”, असे ट्विट सिंटाने (CINTAA) केले आहे. यावेळी मुंबईतील जोगेश्वरीमधील ओशिवरा क्रिमेटोरियम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचेही सिंटाने सांगितले.
 
 
 
नवतेज हुंडल यांनी ‘खलनायक’, ‘तेरे मेरे सपने’ या सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नवतेज हुंडल यांच्या पश्चात त्यांच्या दोन लेकी आणि पत्नी असा परिवार आहे. नवतेज यांची लेक अवंतिका देखील कलाविश्वाशी जोडलेली असून ‘ये है महोब्बते’ या मालिकेमध्ये तिने मिहिका ही व्यक्तीरेखा साकारली आहे.
 
ताज्या बातम्यांसाठी तरुण भारत नागपूरचे मोबाईल ॲप डाऊनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.bharatiweb.tarunbharat