अजित पवारांनी घेतली राज ठाकरेंची बाजू
   दिनांक :09-Apr-2019
 
 
भाजपकडून राज ठाकरेंवर टीका होत असताना आता अजित पवारच राज ठाकरेंच्या बाजूनं मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे आहेत, त्यांना कुणाच्याही स्क्रिप्टची गरज नसल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे जेव्हा भाजपकडून भाषण करत होते त्यावेळेस भाजपाच्या नेत्यांना आतुन उकळ्या फुटत होत्या. बरं वाटत होतं. पण आता त्यांच्या विरोधात राज ठाकरे भाषण करायला लागले की विनोद तावडे पोपटासारखे बोलायला लागले. त्यांच्यावर टीका टिप्पणी करायला लागले असल्याचे अजित पवार म्हणाले.
 

 
 
राज ठाकरे जे काही सांगतात ते स्क्रीनवर दाखवून सांगतात. राज हे बाळासाहेब यांचे पुतणे असून त्याना कशाला स्क्रिप्ट लिहून द्यावी लागतेय असे म्हणत अजित पवार यांनी त्या मुख्यमंत्र्यांना याना टोला लगावला. बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या नारळाच्या शुभारंभप्रसंगी अजित पवार कन्हेरी या गावी बोलत होते. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. गल्लीतील लोक कलाकार आहेत, त्यांना लिहून दिलेल्या स्क्रिप्टवर ते अभिनय करतात. राज ठाकरेंचं भाषण सुद्धा तसंच असतं. ते सुपारी घेऊन भाषण करतात, असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी केला, तर शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे अशा शब्दात शेलार यांनी ट्विटरवरुन राज ठाकरेंवर शरसंधान साधलं आहे.