जागतिक बँकेच्या बैठकीसाठी वित्तमंत्री अरुण जेटली अमेरिकेला रवाना
   दिनांक :09-Apr-2019
नवी दिल्ली, 
जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वॉशिंग्टन येथे होणार्‍या बैठकीसाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज  अमेरिकेकडे रवाना झाले.
  
 
१२ ते १४ एप्रिल या काळात ही बैठक होणार आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात जेटली यांच्यावर किडनी प्रत्यार्पण प्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा राहणार आहे.
 
दरम्यान, जेटली यांच्या अनुपस्थितीत दररोज प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याची जबाबदारी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन्‌ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. भाजपा मुख्यालयात त्या दररोज सकाळी अकरा वाजता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्या पत्रपरिषदेला संबोधित करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 
ताज्या बातम्यांसाठी तरुण भारतचे मोबाईल ॲप डाऊनलोड करा.