आजचे राशी भविष्य, दि. ९ एप्रिल २०१९
   दिनांक :09-Apr-2019
 

मेष - जुन्या गोष्टी विसरण्यात फायदा आहे. नवीन कामासाठी योजना तयार होतील. जवळपासच्या लोकांची मदत मिळेल. दिवस चांगला आहे. चांगली बातमी मिळेल.

वृषभ - सकारात्मक राहा. तुमचा सकारात्मक व्यवहार परिस्थितीलाही सकारात्मक बनवू शकतो. नवीन अनुभव मिळेल. प्रवासाचा योग आहे. व्यवसायात गंभीरतेने काम कराल.

मिथुन - ज्या कामासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करत आहात त्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. अडथळे संपण्याची शक्यता आहे. पैशांसंबंधी तणाव कमी होईल. परिस्थितीत सुधारणा होईल. भावंडांची मदत मिळेल. एखाद्या व्यक्तीशी असलेल्या चांगल्या संबंधांमुळे आनंदी घ्या.

कर्क - कामात मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार राहा. जोडीदाराशी संबंध अधिक दृढ होऊ शकतात. नवीन काम हाती येण्याची शक्यता आहे. उत्पन्नाच्याबाबतीत येणारे अडथळे दूर होतील.

सिंह - कामं पूर्ण होऊन त्याचा फायदा होईल. करियरसाठी चांगल्या संधी मिळतील. एकाग्रता वाढेल. पैशांची समस्या काही प्रमाणात कमी होईल. राहिलेली कामं पूर्ण होतील.

कन्या - जुन्या समस्येचे निराकरण होईल. कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. काही लोक तुमच्याकडे अधिक लक्ष देतील. एखाद्याला मदत कराल, वेळ पडल्यास तुम्हालाही मदत मिळेल.

तुळ - ऑफिसमध्ये तुमच्या मतांवर विचार केला जाईल. नवीन कामासाठी विचार करण्यास दिवस चांगला आहे. आत्मविश्वास वाढेल. कुटुंबासोबत चर्चा कराल. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या संपतील.

वृश्चिक - नोकरी, व्यवसायात काही चांगल्या गोष्टी होऊ शकते. त्यामुळे फायदा होईल. नवीन लोकांशी भेट होईल. धनलाभ होण्याचा योग आहे. आज होणारे बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. खुल्या मनाने विचार करा.

धनु - दिवस चांगला आहे. नोकरी, व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. एखादी समस्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करा. लोकांची मदत मिळेल. महत्त्वाच्या कामात जोडीदाराचा सल्ला घ्या. आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या.

मकर - कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. घरातील सामानाची खरेदी होऊ शकते. प्रवासाचा योग आहे. प्रवासासाठी पैसा खर्च होईल. नवीन कामासाठी योजना कराल.

कुंभ - फायदा होण्यासाठी काहीतरी नवीन मार्ग काढाल. आधी केलेल्या गुंतवणूकीत फायदा होण्याची शक्यता आहे. सकारात्मक राहा. प्रसन्नता राहील. दिवस आनंदात जाईल. प्रयत्न केल्यास महत्त्वाच्या कामात यश मिळेल.

मीन - अनेक गोष्टींसाठी दिवस शुभ आहे. जीवनात काही नवीन बदल होऊ शकतात. अचानक एखादे जुने काम पूर्ण होऊ शकते. आज होणाऱ्या ओळखी फायद्याच्या ठरतील. अनेक लोकांशी होणारी चर्चा फायदेशीर ठरेल. अनुभवी व्यक्तीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल.