काजू उद्योगावर होणार वेबसीरिज
   दिनांक :09-Apr-2019
 
 
 
दिग्दर्शक आदित्य सरपोतदार काजूच्या प्रेमात पडला आहे. उन्हाळ्यात आंबा-काजूचा दरवळ बागांमध्ये पसरतो. सध्या आदित्य देखील कोकणातल्या वेंगुर्ल्यामध्ये ठाण मारून बसलाय. म्हणजे आदित्य काजू बागायतदार वगैरे झालेला नाही. तर सिंधुदुर्गात तो एका वेबसीरिजचं शूटिंग करतोय. गोव्यात राहणाऱ्या एका काजू उद्योजकाची ही एक कौटुंबिक कहाणी आहे. वेंगुर्ले इथल्या कॅम्प भागात या वेबसिरीजचं शूटिंग सुरू आहे. अभिनेता अतुल कुलकर्णी, अश्विनी भावे, मनवा नाईक, ललित प्रभाकर यांच्या यात भूमिका आहेत.