कन्हैया कुमारचा बेगूसरायतून उमेदवारी अर्ज दाखल
   दिनांक :09-Apr-2019
पाटणा,
बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (सीपीआय) उमेदवार म्हणून कन्हैया कुमार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
 
 

 
याठिकाणी चौथ्या टप्यात म्हणजेच २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. बेगूसराय येथे कन्हैया कुमार यांची लढत  भाजपाचे गिरिराज सिंह आणि आरजेडीचे तनवीर हसन यांच्याशी होणार आहे.
 
 
 

- Ads-
तरुण भारतचे फेसबुक पेज लाईक करा
 
 
कन्हैया कुमार यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी जीरोमाइलमध्ये राष्ट्रकवी दिनकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. कन्हैया कुमार यांना समर्थन देण्यासाठी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी सुध्दा उपस्थित होते. याशिवाय अभिनेत्री स्वरा भास्कर, जेएनयू विद्यार्थी संघटनेतील कन्हैया यांचे साथीदार शेहला राशिद, गुरमेहर हे देखील उपस्थित होते.