देशातील परकीय चलन साठ्यात वाढ
   दिनांक :09-Apr-2019
मुंबई,
गेल्या आर्थिक वर्षाअखेरीस देशातील परकीय चलन साठ्यात पाच अब्ज डॉलरची वाढ होऊन तो आता ४११ अब्ज डॉलर या पातळीवर गेला आहे.
 

 
 
२९ मार्च पूर्वीच्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठ्यात केवळ एक अब्ज डॉलरची वाढ झाली होती. दरम्यानच्या काळात शेअर बाजारात आणि इतर क्षेत्रात आलेल्या परकीय गुंतवणुकीमुळे ही वाढ झाली असल्याचे दिसून आले. रिझर्व बॅंकेनेही भांडवल सुलभता वाढविण्यासाठी या काळात चलनाच्या माध्यमातून प्रयत्न केल्यामुळे या साठ्यात वाढ झाली आहे. सोन्याचे मूल्य आता २३ अब्ज डॉलर या पातळीवर आहे.