भाजपा आमदाराच्या ताफ्यावर दंतेवाडा येथे नक्षली हल्ला ; आमदाराचा मृत्यू; पाच जवान शहीद
   दिनांक :09-Apr-2019
 
 भाजपा आमदार भीमा मांडवी यांचा मृत्यू  
दंतेवाडा: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे दोन दिवस उरले असतानाच छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी भाजपा आमदार भीमा मांडवी यांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला केल्याचे वृत्त आहे.  या हल्ल्यात आमदार भीम मांडवी यांच्यासह ५ जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
 
 
 
भीमा मांडवी यांचा ताफा श्यामगिरी गावातून परतत असतानाच आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सशस्त्र नक्षलवाद्यांनी त्यांच्या ताफ्यावर मोठा हल्ला केला.  स्फोटकांचा साहाय्याने आधी गाडी उडविल्यानंतर मांडवी यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला.  हल्ल्याची माहिती मिळताच दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक घटनास्थळाकडे रवाना झाले असून अधिक तपशील थोड्याच वेळात हाती येईल, असे विशेष पोलीस महासंचालक गिधारी नायक यांनी सांगितले.