कॉंगे्रसची न्याय योजना म्हणजे ६० वर्षांतील अन्यायाची कबुलीच
   दिनांक :09-Apr-2019
 
 
पंतप्रधानांचा जोरदार हल्ला
 
नवी दिल्ली: तब्बल सहा दशक गरिबी हटविण्याचा नारा देऊन सत्तेचे सुख उपभोगणार्‍या कॉंगे्रसने आता पुन्हा एकदा गरिबी दूर करण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी न्याय योजना जाहीर केली. प्रत्यक्षात या न्याय योजनेतून कॉंगे्रसने गेल्या 60 वर्षांत गरिबांवर केलेल्या अन्यायाची कबुलीच दिली आहे, असा घणाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चढविला.
 

 
 
 
एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदी बोलत होते. या मुलाखतीत त्यांनी कॉंगे्रसच्या न्याय योजनेवर जोरदार टीका केली. आता न्याय होणार, हाच मंत्र कॉंगे्रसने यातून दिला आहे. म्हणजेच, 60 वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या प्रत्येक सरकारने जनतेवर अन्याय केला, ही बाब ते मान्य करतात. कॉंग्रेस जेव्हा न्यायाची भाषा वापरते, तेव्हा या पक्षाने आतापर्यंत कुणालाच न्याय दिला नाही, हे सिद्ध होते. 1984 च्या शीखसंहारातील पीडितांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. त्यांना कॉंग्रेस न्याय देणार आहे का, तिहेरी तलाकमुळे पीडित असलेल्या महिलांना कॉंग्रेस न्याय देणार आहे का, छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये ज्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते, त्यांना 10 दिवसांत न्याय देतो, अशी हमी देण्यात आली होती, पण 100 दिवस झाले तरी त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यांना न्याय केव्हा मिळणार, असा सवाल मोदी यांनी केला.
 
भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडितांना अद्याप न्याय मिळालेला नाही. प्रख्यात वैज्ञानिक नम्बी नारायण कॉंग्रेसकडे न्याय मागत आहेत. ज्यांना खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात धाडण्यात आले, कॉंग्रेस त्यांना न्याय देणार का, समझोता बॉम्बस्फोट प्रकरणात अडकवलेल्या निरपराध लोकांना कॉंग्रेसने न्याय दिला का, अशी विचारणा करताना, कॉंग्रेसनेच िंहदू दहशतवाद हा शब्द प्रचलित केला. देशातील हिंदू न्याय मागत असताना त्यांना दहशतवादी का संबोधण्यात आले. नरिंसहराव यांनी कॉंग्रेससाठी जीवन समर्पित केले, पण त्यांचे पार्थिव कॉंग्रेसच्या मुख्यालयात ठेवू दिले नाही. नरिंसहराव यांची आत्मा कॉंग्रेसकडे न्याय मागत आहे, असे मोदी म्हणाले.