शाहबाज शरीफ व मुलगा भ्रष्टाचारात दोषी
   दिनांक :09-Apr-2019
लाहोर,
पाकिस्तानच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक न्यायालयाने आज मंगळवारी संसदेतील विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ आणि त्यांच्या मुलाला भ्रष्टाचार आणि सरकारी अधिकारांचा दुरुपयोग करण्याच्या आरोपात दोषी ठरविले आहे.
 
 
 
शाहबाज शरीफ पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री असताना, त्यांनी अनेक मोठे घोटाळे केले. रमझान साखर गिरणीतील घोटाळा सर्वांत मोठा आहे. तसेच, पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेता असलेला त्यांचा मुलगा हमजा हा देखील या घोटाळ्यांमध्ये सहभागी आहे, असे न्या. नजमूल हसन यांनी आपल्या निकालात स्पष्ट केले. यानंतर न्यायालयाने शिक्षेवरील सुनावणी 23 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे.