‘तुला पाहते रे’ मालिका अडचणीत
   दिनांक :09-Apr-2019
- निर्मात्यांना निवडणूक आयोगाची नोटीस
 
लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना टीव्ही मालिकेतून प्रचार करणाऱ्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मालिकेच्या निर्मात्यांना २४ तासांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. यामध्ये ‘तुला पाहते रे’सह इतर काही मालिकांचा समावेश आहे. या मालिकांविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

 
 
‘तुला पाहते रे’, ‘भाभीजी घर पर है’, ‘तुझसे है राबता’ आणि ‘कुंडली भाग्य’ या मालिकांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विविध योजनांबाबत प्रचार केला जात असल्याच आरोप काँग्रेसने केला आहे. ‘तुला पाहते रे’मध्ये ‘मेक इन इंडिया’चे गुणगान गायलं जात आहे. तर ‘भाभीजी घर पर है’ मालिकेतील अंगुरी भाभीनेही नरेंद्र मोदींच्या उज्ज्वला योजनेचं प्रमोशन केलं आहे. संबंधित मालिकेच्या निर्मात्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून २४ तासांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिल्याची माहिती अतिरिक्त निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे.