स्मृती इराणी, सोनिया गांधी गुरुवारी नामांकन भरणार
   दिनांक :09-Apr-2019
अमेठी, 
केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणी आणि संपुआच्या अध्यक्षा सोनिया गांधी गुरुवारी ११ तारखेला अनुक‘मे अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
 
 
 
स्मृती इराणी १७ एप्रिल रोजी आपला अर्ज भरणार होत्या, पण त्या दिवशी सार्वजनिक सुटी आली असल्याने, त्यांनी ११ रोजी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भाजपाचे अमेठी जिल्हाध्यक्ष दुर्गेश त्रिपाठी यांनी दिली.
 

 
 
अर्ज दाखल करताना स्मृती इराणी यांच्यासोबत उत्तरप्रदेशचे मु‘यमंत्री योगी आदित्यनाथ, अमेठीकरिता असलेले भाजपाचे प्रभारी मोहसिन रजा, आ. सुरेश पाशी आणि अन्य नेते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी उद्या बुधवारी या मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. २००४ पासून रायबरेली प्रतिनिधित्व करीत असलेल्या सोनिया गांधी यांच्याविरोधात भाजपाने, अलीकडेच काँग्रेसमधून पक्षात प्रवेश करणारे दिनेश प्रताप सिंह यांना उमेदवारी दिली आहे.