ऊर्मिला मातोंडकरची संपत्ती व शिक्षण किती?
   दिनांक :09-Apr-2019
 
प्रसिद्ध अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर लोकसभेच्या रिंगणात कॉंग्रेसच्या तिकीटावर आपलं नशीब आजमावणार आहे. 48 वर्षीय उर्मिलाने सोमवारी वांद्राच्या कलेक्टर ऑफिसमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रतिज्ञापत्रात उर्मिलाने आपली संपत्ती, शिक्षण, गुन्हेविषयक माहिती जाहीर केली आहे.
 
 
 
ऊर्मिला मातोंडकरची जंगम मालमत्ता 41 कोटी रुपयांच्या घरात आहे. यामध्ये शेअर्स, बॉंड, म्युचुअल फंड (28.28 कोटी) यांचा समावेश आहे. याशिवाय उर्मिलाकडे एक मर्सिडीज कारही आहे.
उर्मिलाच्या स्थावर मालमत्तेमध्ये वांद्रे परिसरातील चार फ्लॅट्‌सचा समावेश होतो. सध्याच्या बाजारभावानुसार या फ्लॅट्सची किंमत  27.34 कोटी रुपये होते. ठाणे जिल्ह्यातील वसईमध्ये ऊर्मिला मातोंडकरच्या नावे दहा एकर जमीन आहे. याची किंमत एक कोटी 68 लाख रुपयांच्या आसपास आहे.
 
ऊर्मिलाच्या शिक्षणाबाबत वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. ऊर्मिलाने तिचं पदवी शिक्षणही पूर्ण केलेलं नाही. तिने मुंबईतील प्रसिद्ध डी. जी. रुपारेल महाविद्यालयात शिक्षण घेतलं, मात्र द्वितीय वर्षानंतर तिने शिक्षण सोडून दिलं. ऊर्मिलाच्या विरोधात कोणताही गुन्हा नोंद नाही. उमेदवारी अर्ज भरताना ऊर्मिला मातोंडकरचे पती मोहसीन मीरही तिच्यासोबत होते. दोघं जण बाईकवरुन वांद्र्यात आले. ऊर्मिलाचे पती मोहसीन यांच्या नावे 35 लाख रुपयांचं फिक्स डिपॉझिट आहे. दुसर्‍या अकाऊण्टमध्ये पाच लाख रुपयांचा समावेश आहे, तर 15 हजारांची रोकड आहे. ऊर्मिलाचा सामना भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या सोबत होणार आहे. 2014 साली गोपाळ शेट्टींनी कॉंग्रेस उमेदवार संजय निरुपम यांचा साडेचार लाखांच्या मताधिक्याने पराभव केला होता.