लेखिका रोझा देशपांडे रुग्णालयात दाखल
   दिनांक :09-Apr-2019
 
 
 
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, साम्यवादी नेत्या आणि लेखिका रोझा देशपांडे(९०) यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या साम्यवादी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या कन्या व कम्युनिस्ट पक्षाच्या माजी खासदार आहेत.
 
शरीरात सोडीयमचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे फुफ्पुसात संसर्ग झाल्याने त्यांना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास दादर येथील शुश्रूषा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
  
 
- Ads-
तरुण भारतचे फेसबुक पेज लाईक करा
 
 
रोझा देशपांडे या १९६७ मध्ये मुंबई उत्तर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या होत्या.