अमरावती विद्यापीठाचा उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार प्रदान
   दिनांक :01-May-2019
वार्षिकांक स्पर्धा पारितोषिकाचे वितरण
अमरावती:१ मे विद्यापीठाच्यावतीने उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार बुधवारी महाराष्ट्र दिनी आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, कुलसचिव डी.एस. राऊत, आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मनिषा काळे व जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर उपस्थित होते.
उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कारांतर्गत शाल, श्रीफळ, गौरव प्रमाणपत्र व चांदीचे पदक देवून कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्य/संचालक स्तरावरील संवर्गात पटलधमल वाधवाणी फार्मसी महाविद्यालय, यवतमाळचे प्राचार्य डॉ. अनिल चांदेवार यांचा, संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक संवर्गात शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथील सहय्यक प्राध्यापक डॉ. मिलींद शिरभाते यांचा, विद्यापीठ स्तरावरील शिक्षक संवर्गात विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागातील सहा. प्राध्यापक सुहास पाचपांडे यांचा, विद्यापीठ प्रथम श्रेणी अधिकारी संवर्गात विकास विभागाचे उपकुलसचिव मंगेश वरखेडे, विद्यापीठ द्वितीय श्रेणी अधिकारी संवर्गात गोपनीय विभागाचे अधीक्षक निदान बारस्कर यांचा, विद्यापीठ तृतीय श्रेणी कर्मचारी संवर्गात विद्या विभागातील कनिष्ठ सहाय्यक मोहन इंगळे यांचा, विद्यापीठ चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गवारीत सामान्य प्रशासन विभागातील सफाईगार शंकर भगतपुरे यांचा आणि संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी संवर्गात साखरखेर्डा, जि. बुलढाणा येथील अधीक्षक दिंगबर धुमाळे यांचा, तर नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी प्रा. राम मेघे अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय, अमरावतीचे प्राचार्य डॉ.एम.एस. अली यांचा रु. 5001/- रोख पारितोषिक व गौरव प्रमाणपत्र देवून सत्कार केला.
 
 
 
वार्षिकांक स्पर्धेत शहरी विभागांतर्गत बिगर व्यावसायिक गटात प्रथम क्रमांक विद्याभारती महाविद्यालय - अमरावती, द्वितीय भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालय-परतवाडा, तृतीय भारतीय महाविद्यालय- अमरावती, व्यावसायिक गटात प्रथम क्रमांक प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅन्ड मॅनेजमेंट-बडनेरा, द्वितीय श्रीह.व्या.प्र.मं.चे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी- अमरावती, तृतीय सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी-अमरावती तसेच ग्रामीण विभागांतर्गत बिगर व्यावसायिक गटात प्रथम क्रमांक गो.सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय- चांदुरबाजार, द्वितीय क्रमांक कला व वाणिज्य महाविद्यालय- बोरी अरब, व तृतीय क्रमांक कला व विज्ञान महाविद्यालय, कु­हा या महाविद्यालयांच्या उत्कृष्ट वार्षिकांकासाठी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचे हस्ते पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले.
सकाळी विद्यापीठातील मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील प्रांगणात 1 मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिनप्रसंगी ध्वजारोहण कुलगुरुंचे हस्ते पार पडले. याप्रसंगी कुलगुरुंनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.