घरातले सोपे व्यायामप्रकार

    दिनांक :10-May-2019
सर्वसाधारणपणे व्यायाम न करण्याची अनेक कारणं मिळतात. पण या दिवसात फिटनेस राखणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे व्यायाम टाळून चालण्यासारखं नाही. या दिवसात घरच्या घरी व्यायाम करता येईल. घरच्या घरी करण्यासारखे काही सहजसोपे व्यायामप्रकार...
 
 
  • जमिनीवर झोपून पिलाटेस हा व्यायामप्रकार करता येईल. यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.
  • दोरीच्या उड्या हा सुद्धा उत्तम व्यायामप्रकार आहे. यामुळे जास्तीत जास्त कॅलरी जाळल्या जातील. दोरीच्या उड्या मारताना खूप मजा येईल.
  • स्पॉट जॉगिंग हा सुद्धा व्यायामाचा अत्यंत साधा आणि सोपा प्रकार. घरच्या घरी तुम्ही जॉिंगग करू शकता.
  • सकाळी उठल्यावर पलंगावर बसून शरीर ताणण्याचे व्यायाम करता येतील. हात आणि पाय ताणल्यामुळे शरीर लवचिक होईल.
  • घरच्या घरी योगासनं करता येतील.
  • शीर्षासन हासुद्धा चांगला व्यायाम आहे. यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते.
  • नाचामुळे शरीरातल्या कॅलरी जाळल्या जातील. त्यामुळे वेळ मिळाला की मस्त नाचा.
  • आरामदायी कपडे घालून पुश अप्स करा. पुश अप्समुळे छाती, पोट, मनगट, मांड्या, पाय यांचा व्यायाम होतो.
  • मेडिसीन बॉल विकत घ्या. या बॉलच्या आधाराने विविध व्यायामप्रकार करता येतील.
  • डंबेल्सच्या मदतीने वेट ट्रेिंनग करता येईल.