घरचे तूप आणि पोळी आरोग्यासाठी उत्तम

    दिनांक :10-May-2019
आजकाल वजनवाढ, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह आणि अनेक पकारच्या व्याधींनी लोक त्रासले आहेत आणि त्यामुळे आहार नियमात तेल तुपाचा वापर कमीत कमी करण्याचा सल्ला बहुतेक वेळा दिला जातो. तूप खाणे तर त्यात निषिद्धच मानले जात आहे. मात्र पोळी, पराठा, भाकरी अथवा रोटीबरोबर प्रमाणात खाल्लेले साजूक तूप किंवा देसी घी प्रत्यक्षात आरोयासाठी खूपच लाभदायी ठरते असे आता संशोधनातून दिसून आले आहे. 
 
 
अनेक प्रयोगातून असे दिसले आहे की पोळीसाठी रीफाईंड तेलाचा वापर होत असेल तर त्यातील पॉलीअनसॅच्युरेटेड फॅडी ॲसिड आरोग्यला धोका निर्माण करत असते. या उलट साजूक तुपाचे सेवन अनेक आजार बरे करते. साजूक तुपाचे मर्यादित सेवन वजन घटविण्यास सहाय्यकारी ठरते कारण या तुपात अ हा घटक असतो, तो चयापचय क्रिया म्हणजे मेटॅबोलीझमचा रेट वाढवितो व त्यामुळे वजन घटते.
  
तूप आणि पोळी किंवा भाकरी पराठा ग्लायसेमिक इंडेक्स कमी करतो. त्याचा फायदा मधुमेहींना होतो. तुपातील सीएलए इन्शुलिनची मात्रा कमी करते त्यामुळे तुपाबरोबर पोळी खाल्ली तर रक्तातील साखर लगेच वाढत नाही आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहते यामुळेही रक्तातील साखर नियंत्रणात येते. तूप पोळीचे सेवन लुब्रिकंटचे काम करते. त्यामुळे हृदय रक्तवाहिन्यात रक्त वाहनाचे काम सुरळीत राखले जाते. तुपाचा ज्वलन बिंदू कमी आहे, त्यामुळे त्यातून लवकर धूर येतो. पण शिजत असताना ते सहज जळत नाही, त्यामुळे ते पचनासाठी चांगले ठरते. रक्तातील तसेच आतड्यातील कोलेस्ट्रॉल तुपामुळे नियंत्रणात येते. त्यामुळे बायलरी लिपीड स्त्राव वाढतो आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते.
 
प्रमाणात खाल्लेले तूप प्रतिकारशक्ती वाढविते. अर्थात साजूक तूप किंवा देसी घी दररोज १ किंवा दोन चमचे याच प्रमाणात आहारात समाविष्ट केले तरच त्याचे फायदे होतात अन्यथा नुकसान होऊ शकते.