सलमान खान लवकरच 'बाबा' होणार!
   दिनांक :10-May-2019
तभा ऑनलाईन  
मुंबई, 
बॉलिवूडचा दबंग सलमान खानला चाहत्‍यांकडून नेहमी एक प्रश्‍न विचारला जातो की, सलमान लग्‍न कधी करणार? मात्र आतापर्यंत या प्रश्‍नाचे उत्तर कोणालाच मिळालेले नाही. मात्र निराश होऊ नका, सलमानच्‍या चाहत्‍यांसाठी एक खुशखबर आहे. कारण सलमान लग्‍न कधी करणार हे माहित नाही मात्र लवकरच बाबा होण्‍याचा विचार करत आहे. 

एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्‍या वृत्तानुसार सलमान खान सरोगेसीच्‍या माध्‍यमातून बाबा होण्‍याचा विचार करत असल्‍याचे म्‍हटले आहे. सलमान खानला लहान मुले किती आवडतात ही गोष्‍ट आतापर्यंत कोणापासून लपलेली नाही. सलमानची मुलांशी जवळीकता अनेक कार्यक्रमात पाहायला मिळाली आहे. तसेच त्‍याची बहीण अर्पिताच्‍या मुलासोबत फोटो व व्‍हिडिओ सलमान खान सोशल मीडियावर शेअर करत असतो.
सरोगसीच्‍या माध्‍यमातून यापूर्वी शाहरुख खान, करण जोहर, एकता कपूर, सनी लियोनी, तुषार कपूर पालक झाले आहेत. सध्‍या सलमान खान ५३ वर्षाचा आहे. 'ईद'च्‍या दिवशी सलमानचा आगामी बिग बजेट आणि बहुचर्चित चित्रपट ‘भारत’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत कटरीना कैफ मुख्‍य भूमिकेत दिसणार आहे.