‘आएगा तो मोदी ही’ हा काही विनोद नाही, हे वास्तवच आहे' : नरेंद्र मोदी
   दिनांक :10-May-2019
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी ‘आएगा तो मोदी ही’ हा काही विनोद नाही, हे वास्तवच आहे, देशातील जनतेनेच हे ठरवले आहे, असे म्हटले आहे.
 
मोदी पुढे म्हणाले, जर कोणाला यात विनोद दिसत असेल ती व्यक्ती अशा गंभीर चर्चेसाठी पात्र नाही. हा विनोद नाही, हे वास्तव आहे. देशातील जनतेनेच ठरवले आहे. कोणत्याही समस्येवर युद्ध हा तोडगा नाही. मात्र, समर्थ व्यक्तीलाच शांतता लाभते. जर दक्षिण आशियात शांतता रहावी असे वाटत असेल तर भारताने सामर्थ्य दाखवले पाहिजे, असे मोदींनी सांगितले.
महात्मा गांधी हे श्रेष्ठ होते. पण एका कुटुंबांचे गुणगान करताना आपण महात्मा गांधी यांच्यावर अन्याय केला, असे मोदींनी नमूद केले. राजकारणात तुम्ही वास्तवाचे भान ठेवले पाहिजे. रील लाइफ आणि रिअल यात फरक असतो. मी स्वप्नांच्या जगात रमत नाही, असेही मोदींनी म्हटले आहे.
 
निवडणुकीनिमित्त देशभरात फिरत आहे. मी गेल्या पाच वर्षांत कार्यालयात बसून नव्हतो. मी जनतेसोबत जास्त वेळ होतो. या अनुभवाच्या आधारे मी सांगू इच्छितो की देशातील जनतेला मजबूत आणि निर्णायक सरकार हवे आहे, असेही मोदींनी आवर्जून सांगितले.