जम्मू-काश्मीरातील हॉटेलमधून तब्बल 30 किलो हेरॉईन जप्त
   दिनांक :10-May-2019
  
 
तभा ऑनलाईन   
श्रीनगर,
जम्मू-काश्मीरस्थित रामबनम परिसरातील एका हॉटेलमधून पोलिसांना तपासणी अंतर्गत तब्बल ३० किलो हेरॉईन सापडले आहे. पोलिसांनी सापडलेली बॅग ताब्यात घेतली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका हॉटेलच्या खोलीतून तपासणी करताना एक अज्ञात बॅग सापडली असून या बॅगेत ३० किलो हेरोइन सापडले आहे. मात्र, ही बॅग कोणाची आहे आणि हॉटेलच्या खोलीत का ठेवण्यात आली हे अजून तरी समजू शकले नाही. त्यामुळे या घटनेचा अद्याप तपास चालू आहे.