तिहेरी अपघातात सहा जणांचा मृत्यू

    दिनांक :10-May-2019
मुंबई : अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील आंबोली येथे दोन कार आणि एका दुचाकीत झालेल्या भीषण अपघातात सहाजणांचा मृत्यू झाला. यात एका महिलेचा समावेश आहे. अन्य दोघे गंभीर जखमी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
माहितीनुसार, मुंबईकडून गुजरातच्या दिशेने निघालेल्या भरधाव कारसमोर दुचाकीस्वार आल्याने त्याला वाचवण्यासाठी दुभाजकावर चढली. मात्र, याचवेळी समोरून आलेल्या कारसोबत तिची धडक झाली. यात सहाजण मृत्युमुखी पडले, तर दोघे गंभीर झाले.