एअर इंडियाकडून तिकिटात मोठी सवलत

    दिनांक :10-May-2019
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील प्रवाशी विमान वाहतूक कंपनी एअर इंडियाने शुक्रवारी अखेरच्या क्षणी केलेल्या तिकीट बुकिंगमध्ये 50 टक्के इतक्या भाडेकपातीची घोषणा केली आहे. विमान प्रवासात अचानक झालेल्या तिकीट वाढीमुळे प्रवाशांना दिलासा मिळू शकतो.

 
 
जेट एअरवेजची अचानक विमानसेवा बंद झाल्याने काही विमान कंपन्यांनी तिकीट दरात वाढ केली होती. त्यामुळे एअर इंडियाने उड्डाणाच्या तीन तास अगोदर केलेल्या तिकीट बुकिं गमध्ये मोठी सवलत जाहीर केली आहे. ऐनवेळी प्रवास करू इच्छिणार्‍यांना हे लाभदायक ठरणार असून, बुकिंग काउंटर, वेबसाईट, अॅप वा एजंटच्या माध्यमातून तिकीट खरेदी केले जाऊ शकते. अशा तिकीट बुिंकगवर 50 टक्के सवलत मिळू शकते.