फेररचा टेनिसला अलविदा

    दिनांक :10-May-2019
रशियाच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हविरुद्ध खेळताना पराभव पत्करावा लागल्यानंतर स्पेनचा प्रमुख टेनिसपटू डेव्हिड फेररने माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेतच टेनिसला अलविदा केला. जागतिक क्रमवारीत अव्वल पाचव्या स्थानापर्यंत मजल मारलेल्या फेररने माद्रिद खुली स्पर्धा ही कारकीर्दीतील अखेरची स्पर्धा असल्याचे जाहीर केले होते.
 
 
 
३७ वर्षांच्या फेररला गेल्या काही काळापासून तंदुरुस्तीची समस्या भेडसावत होती. झ्वेरेव्हविरुद्धच्या सामन्यातदेखील फेरर पहिल्या सेटमध्ये ४-० असा आघाडीवर होता. मात्र, त्यानंतर झ्वेरेव्हने सामन्याची सूत्रे हाती घेत फेररला ६-४, ६-१ असे पराभूत केल्यानंतर मैदानावर पत्नी आणि मुलाच्या उपस्थितीत फेररने साश्रूनयनांनी टेनिसला अलविदा केला.