'द गर्ल ऑन द ट्रेन'चा हिंदी रिमेकमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री
   दिनांक :10-May-2019
हॉलिवूड चित्रपट 'द गर्ल ऑन द ट्रेन'चा हिंदी रिमेक येणार असून या चित्रपटात बॉलिवूडची बबली गर्ल परिणीती चोप्राची वर्णी लागल्याचे समजते आहे. या चित्रपटासाठी ती इंग्लंडला रवाना झाल्याचे समजते आहे.
 
 
 
'द गर्ल ऑन द ट्रेन'चा हिंदी रिमेकच्या चित्रीकरणासाठी परिणीती लवकरच इंग्लंडला रवाना होणार आहे आणि जुलैच्या मध्यापर्यंत चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या जोरदार तयारीला परिणीतीने सुरूवात केली आहे.
परिणीती चोप्रा या चित्रपटाबाबत खूपच उत्सुक असून ती म्हणाली की, यापूर्वी मी कधीही अशाप्रकारची भूमिका केलेली नाही. त्यामुळे माझ्या चाहत्यांनादेखील मी वेगळ्याच रुपात पहायला मिळणार आहे. ही भूमिका माझ्यापेक्षा खूप वेगळी आहे. त्यामुळे अशा नाविन्यपूर्ण प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.
 
 
'द गर्ल ऑन द ट्रेन' चित्रपटाची कथा २०१५ साली सर्वाधिक विक्री झालेल्या पॉला हॉकिन्सच्या पुस्तकावर आधारित असून यामध्ये एका घटस्फोटीत महिलेची कथा रेखाटण्यात आली आहे.