महावितरणच्या स्टोअर रूम मधून 11 लाख 82 हजाराचे साहित्य लंपास

    दिनांक :10-May-2019
तीन महिला आरोपींना अटक
 
 हिंगणघाट: शहरातील नांदगांव मार्गावरिल महावितरणचे स्टोअरमधुन सुमारे ११ लाख८२ हजार किंमतीच्या विज साहित्याची चोरी करण्यात आल्याची तक्रार अभियंता विजय तिवारी यांनी ८ मे रोजी केली होती,या चोरिप्रकरनी हिंगणघाट पोलिसांनी जवळच्या नांदगांव(बोरगांव) येथील तीन महिला आरोपीना ताब्यात घेतले असुंन काही मुद्देमाल सुद्धा हस्तगत केलेला आहे.
हिंगणघाट पोलिसांनी याप्रकरणी नंदा प्रभु सातपुते (वय २५) शोभा संतोष दांडेकर (वय २८)व  रेखा सुरेश गुंजेवार यांना अटक केली असुंन त्यांचेकडून चोरी केलेल्या लाखो रुपये किमतीच्या मालापैकी बराचसा माल हस्तगत केलेला आहे.
महावितरणचे विभागिय स्टोअरच्या टिनाचे शेडचे नट बोल्ट काढून शेडमधील ८ लाख ४९ हजार ५४२ रुपये कॉपर मटेरियल,३ लाख२२ हजार ५५० किमतीचे कॉपर फ्यूज केबल, १० हजार किमतीचे पितळेचे कनेक्टर असा एकूण ११लाख ८२ हजार १२३ रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात इसमांनी लांबविला अशी तक्रार हिंगणघाट पोलिसात केलेली होती.
वरील तक्रारीची दखल घेऊन पोलीस निरीक्षक बंडीवार व चमुने ही कारवाई केली.