दरड कोसळल्याने जम्मू-श्रीनगर हायवे बंद
   दिनांक :10-May-2019
जम्मू-काश्मीर,
बुधवारी रात्री रामबन भागातल्या डिगडोलमध्ये अचानक दरड कोसळल्यानं राष्ट्रीय राजमार्ग बाधित झाला. दरड कोसळल्यामुळे महामार्ग रात्री आठच्या सुमारास बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे महामार्ग बंद झाल्याने जवळपास 1500 वाहने अडकून पडली आहेत. तर दुसरीकडे उधमपूरमध्ये शेकडोंच्या संख्येत वाहनांना थांबवण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासी आणि वाहन चालक राजमार्ग उघडण्याची प्रतीक्षा करत आहेत. परंतु राजमार्ग अद्याप मोकळा करण्यात आलेला नाही.
 
 
बुराजमार्ग बंद झाल्यानंतर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं रात्री राजमार्ग उघडण्याचं काम सुरू केलं आहे. परंतु अनेक तास प्रयत्न करूनही महामार्ग पूर्ववत करण्यात आलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी उधमपूरहून काश्मीर खोऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांना प्रतिबंध घातला आहे.