कंगनाच्या बहिणेने साधले ह्रितिकवर निशाणा, म्हणाली...
   दिनांक :10-May-2019
ऋतिक रोशनच्या सुपर 30 सिनेमाच्या रिलीजला मुहूर्त काही सापडत नाही आहे. 26 जुलैला हा सिनेमा रिलीज होणार होता. मात्र पुन्हा एकदा याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. कारण त्याचदिवशी कंगनाचा 'मेंटल है क्या' सिनेमा रिलीज होणार आहे. त्यामुळे कंगनाला घाबरुन ऋतिकने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली का असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
 
 
 
ऋतिकने इन्स्टा आणि ट्विटरवर आपण सुपर 30 च्या निर्मात्याना सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यास सांगितली असल्याचा खुलासा केला आहे. ऋतिकने लिहिले आहे की, मानसिक त्रासापासून वाचण्यासाठी मी सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यास सांगितली आहे. लवकरच सिनेमाची रिलीज डेट तुम्हाला सांगण्यात येईल.
 
 
यावर रंगोलीने पुन्हा एकदा ऋतिकवर निशाणा साधला आहे, '' गेल्या आठवड्यात ऋतिक रोशन, मधु मनतेना आणि एकता कपूरने एकत्र मीटिंग करुन सुपर 30 ची रिलीज डेट पुढे शिफ्ट केली. मला नाही माहिती ऋतिक त्याची दुखभरी कहानी का सांगतो. पण मला गर्व आहे की 'मेंटल है क्या' सिनेमा सोलो रिलीज होतोय. मी निर्मिती एकता कपूरला सैल्यूट करते की पुरुष प्रधान इंडस्ट्रीत तिने जे साहस केले त्याला सलाम करते.''